HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून "टेक्नोत्सव 2 के 25"

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून "टेक्नोत्सव  2 के 25"

कसबा बावडा - डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे 24 व 25 एप्रिल रोजी "टेक्नोत्सव 2 के 25" या अभियांत्रिकीच्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या सर्व वर्षांच्या सर्व विद्याशाखांसाठी असून कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण  झाले. 

        

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गुप्ता म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी आणि त्यांच्या अंतर्गत गुणांना वाव देण्यासाठी आम्ही "टेक्नोत्सव 2 के 25"  ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा कॉम्पुटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग, सिव्हिल, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, केमिकल व आर्किटेक्चर या विभांगामध्ये होईल. यासोबतच "टेक्निकल पेपर प्रेझेन्टेशन" स्पर्धा व "ब्लेंडर थ्रीडी मॉडेलिंग" वर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. सुमारे अडीच लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी https://technotsav-dypcet.vercel.app/ या संकेत स्थळावर भेट द्यावी. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डीन अकॅडेमिक्स डॉ. भगतसिंग जितकर, संयोजक डॉ. कपिल कदम व डॉ. प्रशांत जगताप, सर्व विभागप्रमुख, अध्यापक वर्ग व विद्यार्थी- विद्यार्थिनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.