तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे "कोड मंत्रा 2025'' भव्य कोडिंग स्पर्धेचे आयोजन
![तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे "कोड मंत्रा 2025'' भव्य कोडिंग स्पर्धेचे आयोजन](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a9b3658e891.jpg)
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था), वारणानगर येथे दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी "कोड मंत्रा 2025" या भव्य कोडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्य वाढवणे आणि तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे हे आहे.
"कोड मंत्रा 2025" मध्ये कोडिंग प्रश्न, तांत्रिक समस्यांवर चर्चा आणि लॉजिकल विचारशक्तीला चालना देणारी आव्हाने असतील. विद्यार्थ्यांना आपली क्षमता दाखवण्यासाठी ही एक उत्तम संधी मिळणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे(सावकार), तसेच शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी ,प्राचार्य डॉ. बी. टी. साळोखे, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. पी. जे. पाटील समन्वयक, डॉ .ए. व्ही. पाटील आणि कार्यक्रम समन्वयक आकाश सूर्यवंशी ,सिद्धार्थ कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेसाठी अध्यक्ष म्हणून TCS (पुणे) मधील प्रमोद भोसले उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.