देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री... अशी आहे कारकीर्द

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री... अशी आहे कारकीर्द

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले. १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे अर्थातच देवेन्द्र फडणवीस. आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला देशातील नामवंत नेते उपस्थित राहणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांचे प्रारंभिक जीवन 

देवेंद्र गंगाधर फडणवीस  हे भारतीय जनता पक्षातील नेते आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै इ.स. १९७० रोजी झाला. फडणवीस यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले. आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना, जनसंघाचे सदस्य असताना, सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. फडणवीस यांनी नंतर इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला कारण त्यांना पंतप्रधानांच्या नावाच्या शाळेत जायचे नव्हते कारण त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकले होते. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या सरस्वती विद्यालय शाळेत शिक्षण घेतले. फडणवीस यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.फडणवीस यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आहे.

राजकीय प्रवास 

देवेंद्र फडणवीस हे  नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी, वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. २०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. देवेंद्र फडणवीस १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभळ सक्षम नेतृत्व समजलं जात. मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करणारे मुख्यमंत्री आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे मुख्यमंत्री असाही त्यांचा नावलौकिक आहे. आज मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर  देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.