धक्कादायक : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा महिलेवर आरोप

धक्कादायक : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा महिलेवर आरोप

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : हैदराबादच्या एका उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या  एका महिलेने १७ वर्षीय मुलावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आल्याचे  पोलिसांनी सांगितले. मुलाच्या पालकांनी हा आरोप केला आहे. 

पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मुलगा आणि ती महिला, दोघेही सहमतीने संबंधात होते.

मुलाच्या पालकांनी पोलिसांना  सांगितले की त्यांच्या मुलाने  नुकतीच दहावी पूर्ण केली असून काही दिवसापासून तो नैराश्यात होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुलाने नंतर त्याच्या पालकांना सांगितले की शेजारच्या एका महिलेने त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले आहेत.

“जेव्हा पालकांना हे कळले तेव्हा त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तांत्रिकदृष्ट्या हा पोक्सोचा खटला आहे. संमती असो वा नसो, तो गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असे पश्चिम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'indianexpress.com' ला सांगितले.

हैदराबाद शहर पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालानुसार, शहरात नोंदवलेल्या पोक्सो प्रकरणांची संख्या २०२३ मध्ये ३७१ च्या तुलनेत ४४९ वर पोहोचली आहे.