Bachchu Kadu PC : कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक , 'या' नेत्याच्या घरासमोर करणार आंदोलन

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय. त्यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय. बच्चू कडूंनी 'डिसीएम टू सीएम' अशा आंदोलनाची घोषणा केली आहे.
2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर 'अर्थसंकल्प वाचन आंदोलन' करीत त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणार असल्याचं बच्चू कडू यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितल आहे.
अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणारा आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे.