धक्कादायक : कौटुंबिक वादातून आईसह 4 बहीणींची मुलानेच केली हत्या

धक्कादायक : कौटुंबिक वादातून आईसह 4 बहीणींची मुलानेच केली हत्या

लखनऊ : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये 5  जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये 4  मुली आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. अर्शद असे आरोपीचे नाव असून त्याचे वय सुमारे २४ वर्षे आहे. 

नवीन वर्षातच मुलगा बनला कुटुंबासाठी काळ 

नवीन वर्षाच्या आगमनासाठी संपूर्ण जग सज्ज असताना एक २४ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबाचा काळ बनला. शुल्लक कारणावरुन त्याने आपल्या बहिणी आणि आईला यमसदनी धाडले. ही धक्कादायक घटना लखनऊ येथे घडली आहे.

धारदार ब्लेडने केली हत्या 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्शदने धारदार ब्लेडने या पाचही जणांची हत्या केली. पोलिसांनी चौकशी केली असता चौकशीदरम्यान अर्शदने वारंवार आपले म्हणणे बदलण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जरा कठोरता दाखवली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हे कुटुंब ३० डिसेंबरला लखनऊला फिरण्यासाठी आले होते, असेही समोर आले आहे. 

नाका परिसरातील हॉटेल शरणजीतमध्ये हे लोक थांबले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आवश्यक कारवाई सुरू केली. आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६), रहमीन (१८) आणि अस्मा अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अस्मा या मुलांच्या आईचे नाव आहे.