नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधीची वेळ ठरली, 'या' दिवशी घेणार शपथ

नव्या मुख्यमंत्र्यांच्या  शपथ विधीची वेळ ठरली, 'या' दिवशी घेणार शपथ

मुंबई : नवे सरकार कधी स्थापन होणार नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळणार याच्या चर्चा गेल्या चार पाच दिवसांपासून रंगल्या होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी शपथ घेणार याची वेळ आता ठरली आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीतील घटक पक्ष असणारे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्याकडून गटनेता निवडण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे नाव गटनेता म्हणून जाहीर करण्यात आले. पण अद्यापही भाजपकडून गटनेता निवडण्यात आलेला नाही. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,२ किंवा ३ डिसेंबर रोजी भाजपचा गटनेता निवडण्यात येणार असून ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता हा शपथविधी आझाद मैदानात पार पडणार आहे. अजूनही मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून नाव घोषित करण्यात आले नसले तरी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.