नागपुरात पिता - पुत्रांची हत्या

नागपुरात पिता - पुत्रांची हत्या

 नागपूर : येथील रामटेक नगर टोळी  या भागात पिता-पुत्राचा खून झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जुन्या वैमनस्यातून 5 आरोपींनी मिळून पिता-पुत्राची हत्या केली. विजय बजरंग सावरकर (54) आणि मयूर विजय सावरकर (27, रा. रामटेकेनगर टोळी, गल्ली क्रमांक 4) असे हत्या झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.

हल्लेखोरांमध्ये रामटेके नगर टोळीतील संदीप नाडे, बादल गणेश कुर्वेती, शुभम गणेश कुर्वेती, एक १७ वर्षीय अल्पवयीन आणि एक अज्ञात आरोपी यांचा समावेश आहे. मृत मयूरवर खुनासह गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तर त्याचे वडील विजयवरही काही गुन्हे दाखल आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते गुन्हेगारीपासून दूर होते. हे दोघेही बेलतरोडी रोडवर सावरकर फर्निचर नावाचे दुकान चालवतात. अजनी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.