प्रहार शिक्षक संघटना सांगली जिल्हा विकास पतसंस्थेच्या बाबतीत निर्णायक राहणार - श्री चंद्रशेखर क्षीरसागर

पत्रकार- सुभाष भोसले
प्रहार संघटना हि समाजसेवक आणि मंत्री ना.श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालीआणि राज्याध्यक्ष श्री संतोष राजगुरू मार्गदशनात राज्यात काम करत आहे. इस्लामपूर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री चंद्रशेखर क्षीरसागर बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की सांगली जिल्ह्यात अल्पावधित शिक्षकांच्यात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. बऱ्याच वर्षीचा चळवळीचा अनुभव व तळमळ यामुळे पतसंस्थेचे बरेच सभासद प्रहार संघटनेच्या संपर्कात असून निवडणुकीत मोठ्या संख्येने पाठीशी राहून वेगळा इतिहास निर्माण करण्याच्या भूमिकेत आहेत.तरीही योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे ठरले आहे. प्रत्यक्ष,फोन व इतर माध्यमातून संपर्कात असणाऱ्या सभासदांच्या न्याय देण्याचे प्रयत्न करू असे श्री चंद्रशेखर क्षीरसागर यावेळी म्हणाले.
यावेळी सरचिटणीस श्री अमोल जाधव, श्री सचिन बामणे, श्री भानुदास पवार, राजू जाधव, राजेश जोशी, सचिन पवार व इतर उपस्थित होते.