'फुले' सिनेमावरून वाद: अनुराग कश्यपची सेंसर बोर्ड आणि ब्राह्मण संघटनांच्या भूमिकेवर टीका

मुंबई: महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' हा चित्रपट वादात सापडला आहे. या सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यानंतर काही ब्राह्मण संघटनांनी त्याला विरोध केला, ज्यामुळे सेंसर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर कात्री चालवली आहे.
या प्रकरणावर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विचारले आहे की, जर देशातून जातीव्यवस्था संपवली गेली असेल, तर अजूनही जातीच्या नावावर विरोध कशासाठी होत आहे? त्यांनी ब्राह्मण संघटनांच्या भूमिकेवर तसेच सेंसर बोर्डाच्या निर्णयावर कठोर टीका केली आहे.
अनुराग कश्यप यांनी असेही म्हटले की, जातीवादावर भाष्य करणाऱ्या 'फुले', 'धडक २', 'पंजाब 95' यांसारख्या अनेक चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड अडवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकार आणि सेन्सॉर बोर्ड स्वतःचा खरा चेहरा पाहण्यास घाबरतात, म्हणून असे सिनेमे थांबवले जातात.