बजेटमध्ये साखर उद्येागाचा नामेाल्लेख नाही- पी. जी. मेढे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील टेक्सटाईल नंतर देान नंबरचा असलेल्या साखर उद्येागा बाबत केाणताही उल्लेख नसून बजेट मध्ये कांहीही तरतूद नाही. अशी प्रतिक्रिया साखर उद्येाग अभ्यासक पी. जी. मेढे यांनी दिली.
साखर उद्येागाकडून कर्जांची पुनरबांधणी, कमी व्याज दराचे कर्ज येाजना, साखर, इथेनॅाल दर, साखर निर्यात, सहविज निर्मिती दर वगैरे बाबत कांहीतरी धेारणात्मक निर्णय हेाईल अशी अपेक्षा हेाती. पण त्याबाबत कांहीही धेारण जाहिर झालेले नाही. त्यामुळे त्यादृष्टीकेाणातून साखर उद्येागाची निराशाच झालेली आहे असे म्हणावे लागेल.
निदान यानंतर येता सिझन सुरू हेाण्यापूर्वी तरी यांचे निर्णय केंद्र शासन घेईल अशी साखर उद्येाग आशेने पहात आहे. तथापी एकच महत्वाची बाब म्हणजे इनर्जी साठी एकूण ६८,७६९/- केाटी बजेट आरक्षीत केलेले असून त्यापैकी १० हजार केाटी सेालर पावर साठी मिळणार आहेत. साखर कारंखान्याना त्यांच्याकडे रिकामे असलेल्या जमिनीवर सेालर पावर प्रकल्प उभे करून जादा उत्पन्नाचा स्त्रेात केाणतेही इंधनाचा वापर न करता निर्माण हेाणार आहे.
याशिवाय कृषि क्षेत्रात उत्पादकता वाढ, पर्यावरण पूरक नवीन जाती निर्माण करणे, बियाणां मध्ये विज्ञान, रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट या बाबींवर या बजेटमध्ये विशेष भर दिला असलेने त्याचा साखर उद्येागास अप्रत्यक्षपणे फायदा हेाणार आहे.