टाऊन हॉल येथील भिंतीवरच्या महापुरुषांचे फोटो काढा-राजे फाऊंडेशन
कोल्हापूर प्रतिनिधि: येथील टाऊन हॉल जवळील कोल्हापुरी थाळी शेजारील भिंतीवर कोल्हापूर महानगरपालिके मार्फत महापुरुषांची छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. सदरची छायाचित्रे ही कोल्हापूरचा इतिहास उलगडण्यासाठी तसेच लोकांना समजण्यासाठी ही छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. ही बाब कोल्हापूरसाठी कौतुकास्पद आहे. पण त्या ठिकाणी सद्या घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि काही विकृत लोकांच्या कडून त्या ठिकाणी काही वस्तू टाकण्यात येतात त्यामुळे महापुरुषांची छायाचित्रे भिंतीवरून हटूउन त्या ठिकाणी सुविचार किंवा अन्य काही तरी लिहावे. अशी मागणी आज राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले. या वेळी राजे फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष रियाज जैनापुरे,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र पोवार,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव उत्तम शेलार,कोल्हापूर जिल्हा सह सचिव मंजूर सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.