कोरे अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागास पीच. डी. रिसर्च लॅबसाठी मान्यता
वारणानगर (प्रतिनिधी) - येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेकनॉलॉजि (ऑटोनॉमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाला शिवाजी विद्यापीठाकडून रिसर्च लॅब साठी मान्यता मिळाली. या महाविद्यालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ पासून संशोधन केंद्र पीएच. डी. - मेकॅनिकल इंजिनीरिंग विभाग या अभ्यास क्रमासाठी विद्यापीठास प्रस्ताव पाठविला होता, त्यास विद्यापीठ अधिकार मंडळाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी दिली.
वारणा खोऱ्याचे भाग्य विधाते तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या वारणा खोऱ्यातील अभियंता जागतिक स्तरावर पोहोचावा म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९८३ साली केली तसेच १९९६ पासून मेकॅनिकल विभागास मान्यता मिळाली असून या विभागामध्ये पदवीत्तर शिक्षणाची सोय हि असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने आणि डीन डॉ. एस. एम. पिसे यांनी दिली. तसेच वारणा विभाग शिक्षण मंडळ व विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असते असे हि त्यानी यावेळी नमूद केले.
आमच्या विभागाचा शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्यांचे निकाल आणि विविध कंपन्यातील निवड सर्वोत्कृष्ट आहे तसेच विभागातील विद्यार्थी हे अष्टपैलू असून कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतील व महाविद्यालय व देशाचे नाव उज्ज्वल करतील. महाविद्यालयास स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून यूजीसी कडून दर्जा प्राप्त झाला त्याचा चांगला परिणाम विध्यार्थ्यांच्या कौशल्यावर होणार असून भविष्यात आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडणारी मुले हि उच्च गुणवत्तेची असतील अशी भावना विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुळीक यांनी व्यक्त केली.