बालिंगे येथे.... सर्वधर्म समभाव संदेश देणारा उपक्रम

बालिंगे येथे.... सर्वधर्म समभाव संदेश देणारा उपक्रम

कोल्हापूर प्रतिनिधी :- मुबारक अत्तार 

बालिंगे येथे धर्म जाती या शब्दाला थारा न देता बालिंगे येथील सामाजिक कार्यकर्ते 

आनंद जाधव.ग्रामपंचायत सदस्य धनंजय ढेंगे..कृष्णात माळी.प्रकाश जांभळे यांच्या पुढाकाराने माळवाडी बालिंगे येथे एका मुस्लिम विधवा महिलेच्या कुटुंबासाठी निगार नवाज तहसीलदार या कुटुंबासाठी येणाऱ्या रमजान ईदच्या निमित्ताने त्या कुटुंबासाठी... शीरखुर्मा साठी लागणारे मसाल्याचे पदार्थ तसेच चांगल्या पद्धतीचे तांदूळ तसेच त्या विधवा महिलेच्या मुलासाठी कपडे अशा पद्धतीची मदत करून बालिंगेतील युवकांनी एक नवीन आदर्श बालिंगे गावासाठी घडवून दिला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित सचिन बुडके राजेंद्र चौगुले अजय वाडकर संदीप देंगे अजिंक्य कोरे सचिन कारंडे विलास वागवेकर मोहन कांबळे मयूर माळी पिंटू घोडके तसेच भागातील तरुण उपस्थित होते.