1993 मुंबई दंगलीतील आरोपींच्या बाबतीत पुन्हा काय घडलं!
मुंबई (प्रतिनिधी) : १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीतील संशयीत आरोपी सय्यद नादीर शहा अब्बास खानला ३१ वर्षांनंतर आर. एके. मार्ग पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. शिवडी येथून त्याला अटक करण्यात आली. ६५ वर्षीय खानविरोधात १९९३ साली आर. एके. मार्ग पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांखाली भांदवि कलम १४३ (बेकायदेशीर जमाव जमविणे), १४४ (बेकायदेशीर जमाव जमवून घुसखोरी करणे), १४५ (बेकायदेशीर जमाव जमवून हिंसा करणे), १४६ (दंगली करणे), १४७ (दंगलीच्या गुन्ह्यात सहभाग), १४८ (हत्यार घेऊन दंगलीत सहभाग), १४९ (सर्वसाधारण गुन्हा), ३०७ (खूनाचा प्रयत्न) आणि ३४ (सर्वसाधारण हेतू) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी, खानला अटक करण्यात आली होती आणि त्याच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरू होता. पण जामिनावर सुटका झाल्यानंतर तो गायब झाला होता आणि त्याला फरार घोषित करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. ३१ वर्षांनंतर, आर. एके. मार्ग पोलिसांनी त्याला शिवडी येथून पुन्हा अटक केली.