बावी पीडित मारामारीत चौघांचा मृत्यू

बावी पीडित मारामारीत चौघांचा मृत्यू

 

धाराशिव : बावी पीडी (ता. वाशी, जि. धाराशिव) येथे आज सकाळी दोन गटात शेतात पाणी देण्यावरुन वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये चौघाजणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. मृतांत एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणी चौघाजणांना ताब्यात घेतले आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात घाबरहाट पसरली आहे. 

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पारधी समाजात आपापसात वादाला सुरुवात झाली. शेतात पाणी देणं हा तत्कालीन वाद असला तरी दोन्ही गट एकमेकांच्या परिचयाचे असल्याने पूर्ववैमनस्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.