महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा" मोठा सहभाग*

संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. या प्रमुख मागणीसाठी राज्य _*मध्यवर्ती कर्मचारी निमसरकारी समन्वय समितीने*_ पुकारलेल्या बेमुदत संपाची यवतमाळ शहरात बाईक शानदार सुरुवात झाली जिल्हा परिषद शिक्षकांचा ९७% च्या वर सहभाग आज दिसून आला.बाकी शिक्षक दीर्घ वैद्यकीय रजेवर असल्याने ते संपात सहभागी होऊ शकले नाही.त्यामुळे *संप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.* शिक्षकांसोबतच सर्व संवर्गाचे कर्मचारी आजच्या बेमुदत संपत बिनधास्तपणे उतरल्याची चित्र स्पष्ट झाले. शासनाने कारवाईचा भाग दाखवल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संपात भागीदारी केली. *जुनी पेन्शन लागू केल्यावरच बेमुदत संप मागे घेतल्या जाणार* हे प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे यांनी व्यासपीठावरून ठणकावून सरकारला सांगितले आहे. सरचिटणीस गजानन देऊळकर कार्यालयीन सचिव किशोर सरोदे महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता जतकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या शंभर टक्के सदस्यांनी संपात भागीदारी करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला.
जिल्हातील सर्व तहसील कार्यालयावर यावेळी बाईक रॅली तथा मोर्चा काढून बेमुदत संपाची सुरुवात केली.विविध तालुक्यातील शिक्षक समितीचे नेतृत्व करणारे अर्चना भरकाडे ,जिल्हा उपाध्यक्ष विजय माने,प्रकाश टेकाळे, विभाग प्रमुख चारुहास सारफळे,अभिजीत नवलकार मुकेश भोयर, अशोक चटप, अभिजीत ठाकरे, संदीप मोहाडे, संदीप क्षीरसागर, आशन्ना गुंडावार विजय लांडे, मिलिंद देशपांडे, राधेश्याम चेले, मारोतराव काळेकर,अरविंद गांगुलवार, दिनेश वेळूकर महेश सोनेकर, हेमंत सिडाम, पुंडलिक रेकलवार, प्रफुल्ल पुंडकर, विजय मलकापुरे, कवडू गेडाम, रवींद्र उमाटे, विशाल साबापुरे, मधुकर मोरझडे, सुनील गवळी, दशरथ सूर्यवंशी, संदीप ससाणे, सुनील भोयर, संजय राऊत, संजय गडपायले, घनश्याम निमकर, विजय मुंगे, विनोद भारसाकळे, शंकर मेथाडे, गणेश भागवत, राजेश बोकडे, पुरुषोत्तम मेश्राम, विजय लक्षट्टीवार, विश्वनाथ कामनवार, संजय कदम, पवन महिंद्रे, गणेश देऊळकर, दीपक बसवनाथे, ओमप्रकाश पिंपळकर, रणजित ठावरी, अशोक सव्वालाखे, यशवंत होटे, मिलिंद अंबलकर,उमेश बुटले संभाजी निंबाळकर, उमेश बांगर, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यांनी संप यशस्वी करण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे