मा. आमदार जयंत आसगावकर यांनी सांगली शिक्षणाधिकारी कार्यालयास भेट विविध प्रश्न बाबत चर्चा केली*
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
आज दिनांक 12 मे 2023 रोजी पुणे विभागाचे कार्यसम्राट
आमदार जयंत आसगावकर यांनी सांगली येथे शिक्षणाधिकारी कार्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत शिक्षणाधिकारी मा. राजेसाहेब लोंढे यांच्याशी चर्चा करून उपलब्ध प्रस्ताव तातडीने निकाली काढणेच्या सूचना दिल्या. तसेच आमदार फंडातून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सांगली यांचे कार्यालयास मल्टी फंक्शनाल प्रिंटर प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विविध थकीत बिले तसेच प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लिपा उपलब्ध करून देणे बाबत जून महिन्यामध्ये कॅम्प घेऊन नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या. याप्रसंगी शिक्षणाधिकारी कार्यालय व वेतन पथक कार्यालय यांनी टप्पा अनुदानित शिक्षकांचे मान्यता ,शालार्थ आयडी व वेतन काढणे, DCPS/NPS धारक शिक्षकांच्या फंडाच्या स्लिपाबाबत बाबत चांगल्या पद्धतीने नियोजन केले बाबत कौतुक केले. तसेच सदर कार्यालयास आवश्यक साधने उपलब्ध करून देणेबाबत आग्रही राहू असे अभिवचन देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची पारदर्शक व तत्परतेने सोडवणूक करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रा. अरविंद जैनापुरे ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष श्री राजेंद्र नागरगोजे, बहुजन अधिकारी कर्मचारी संघाचे पुणे विभाग अध्यक्ष श्री. विजयकुमार कांबळे, सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह श्री.शैलेश गोंधळे, उपाध्यक्ष श्री.प्रकाश बन्ने इतर प्रतिनिधी व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*