'या' कारणामुळे 'लाखात एक आमचा दादा' मालिकेवर ट्रोलर्सचा भडिमार

मुंबई - दैनंदिन मालिकांमध्ये काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र हे प्रयोग कधी यशस्वी ठरतात, तर कधी प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेने असाच एक प्रयोग केला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे पण नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे. प्रोमो व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मालिकेवर टीका केली आहे. 'स्वस्तातला पुष्पा' अशी उपरोधिक टिप्पणी करत काहींनी थेट कॉपी केल्याचा आरोप केला आहे. काहींनी मालिकेवर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोपही केला आहे.
https://www.instagram.com/reel/DKKTF5-s07A/?utm_source=ig_web_copy_link
ही मालिका अनेक कारणांमुळे चर्चेत असते. गिरीश ओक आणि नितीश चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेची कथा पाच बहिणी आणि त्यांचा एक भाऊ अशी आहे. बहिणींसाठी काहीही करणारा हा भाऊ – सूर्या – सध्या एका गंभीर प्रसंगाला सामोरा जात आहे. त्याच्या बहिणीवर तिच्या नवऱ्याने गर्भधारणेबाबत संशय व्यक्त केला असून, त्यामुळे सूर्या संतप्त झालेला आहे.
या पार्श्वभूमीवर मालिकेच्या एका सीनमध्ये सूर्या देवीसमोर तांडव करताना दिसतो, आणि त्याचा लुक 'पुष्पा' चित्रपटातील अल्लू अर्जुनसारखा आहे – हिरवी साडी, गळ्यात दागिने, कपाळावर कुंकवाचा टिळा असा अवतार. मात्र हा लुक आणि हा सीन प्रेक्षकांना रुचलेला नाही.