HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या महाराष्ट्र दौरा ; 'या' ठिकाणाहून केली सुरुवात

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या महाराष्ट्र दौरा ; 'या' ठिकाणाहून केली सुरुवात

कोल्हापूर - सोशल मीडियावर प्रभाव निर्माण करणारे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूर येथून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात केली. नागपूर आणि वर्धा या शहरांतील विविध सामाजिक, राजकीय आणि डिजीटल उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

दौऱ्याच्या प्रारंभी त्यांनी नागपूरमधील भाजप कार्यालयाला भेट दिली आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. डिजीटल माध्यमांचा तरुणांसाठी सकारात्मक वापर व राजकीय क्षेत्रातील संधी यावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर जापनिज गार्डन येथे त्यांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सशी मनमोकळा संवाद साधला. या भेटीसाठी 300 पेक्षा अधिक उत्साही युवक - युवती हजर होते.

महाडिक यांनी नागपूरचे आ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला. यावेळी तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, स्टार्टअप्सना चालना आणि क्रीडा क्षेत्रातील संधी यावर आपले विचार मांडले.

वर्धा येथे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकाराने आयोजित ‘विदर्भ क्रिएटर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये प्रमुख वक्ता म्हणून कृष्णराज सहभागी झाले. त्यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर आणि त्याचा समाजावर होणारा प्रभाव यावर विचार मांडत, विदर्भातील युवकांना दिशा दिली. त्यांनी सोशल मीडियाचा उपयोग सामाजिक एकता, विकास आणि सकारात्मक विचारवृद्धीसाठी होऊ शकतो असे प्रतिपादन केले.

यानंतर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विशेष अतिथी म्हणून महाडिक यांना आमंत्रित करण्यात आले. देशभरातील नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ‘खेलो इंडिया’ मोहिमेचा संदर्भ देत, क्रीडेमुळे आत्मविश्वास, शिस्त, आरोग्य आणि संघभावना कशी निर्माण होते याचे महत्त्व सांगितले.

आपल्या दौऱ्यास नागपूरमधून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महाडिक यांनी फॉलोअर्स, तरुण कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.