राज्यातील "या" भागात आज मुसळधार पावसाचा इशारा ; अनेक ठिकाणी "ऑरेंज अलर्ट"..!
नागपूर (प्रतिनिधी) : यावर्षी प्रचंड कुणाच्या झाल्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. अनेक ठिकाणी वरून राजाचं आगमन झाला आहे. यादरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पश्चिम विदर्भात कालच म्हणजे मंगळवारी मोसमी पावसाने हजेरी लावली. तर पूर्व विदर्भात अद्याप मोसमी पावसाचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मोसमी पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या वाटचालीसाठी जरी पोषक वातावरण असले तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये स्थिती सामान्य नाही. त्यामुळे पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वत्र समाधानकारक पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये "ऑरेंज अलर्ट" जारी करण्यात आला असून मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचा हवामान खात्याने सांगितलं आहे.