हज यात्रेसाठी गेलेल्या 550 भाविकांचा मक्का येथे मृत्यू

हज यात्रेसाठी गेलेल्या 550 भाविकांचा मक्का येथे मृत्यू

सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. दरम्यान, हज यात्रेवरही (मक्का, सौदी अरब) उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम झाला आहे. तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मृतांमधील ३२३ भाविक हे इजिप्तचे नागरिक होते. हज यात्रेच्या वेळी तापमान ४८ डिग्री सेल्सिअस (११८ डिग्री फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले होते. उष्माघाताच्या घटना मुख्यतः वृद्ध भाविकांमध्ये दिसून आल्या आहेत, ज्यात हृदयविकाराचे अनेक प्रकरणे समाविष्ट आहेत 

सौदी अरबमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, या भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीचा गर्दी चेंगरून मृत्यू झाला आहे. मक्केजवळील अल-मुसाइम येथील रुग्णालयाच्या शवागारातून मिळालेल्या माहितीनुसार उष्माघाताने ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

सर्वाधिक प्रभावित झालेल्या भाविकांमध्ये इराण, अल्जेरिया, मोरोक्को आणि इजिप्तमधील भाविकांचा समावेश आहे.  सऊदी अधिकाऱ्यांनी उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष वैद्यकीय पथके आणि फील्ड हॉस्पिटल्स उभारली आहेत, ज्यामुळे अनेकांना त्वरित मदत मिळाली.