राज्य परिवहन महामंडळाची स्मार्ट कार्ड ऑनलाईन प्रणाली डिसेंबर महिन्यापासून बंद

राज्य परिवहन महामंडळाची स्मार्ट कार्ड ऑनलाईन प्रणाली डिसेंबर महिन्यापासून बंद

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :-नारायण लोहार 

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या जेष्ठ नागरिक,75वर्षावरील नागरिक व पञकार यांना राज्य परिवहन महामंडळामार्फत काही सुविधा पुरवल्या जातात. प्रवासी एस टी.डेपोमध्ये या सुविधा मिळवण्यासाठी स्मार्ट कार्ड काढतो.राज्य परिवहन lमहामंडळाच्या संभाजीनगर डेपोत एस.टीचे अधिकारी श्री.भिसे यांच्याकडे चौकशी केली असता असे समजले की स्मार्ट कार्ड देणारी ऑनलाईन प्रणाली डिसेंबर महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी. डेपोमध्ये बंद आहे. या व्यवस्थेमुळे प्रवाशांना ञास होत आहे.काही वाहक या प्रवाशांकडून फुल तिकिट आकारत आहेत.यामुळे प्रवाशी व वाहक यांच्यात शाब्दिक वाद होत आहेत. जोपर्यंत ऑनलाईन प्रणाली दुरूस्त होत नाही तोपर्यंत प्रवाशांना आधारकार्ड किंवा ओळखपञ यांच्या आधारे प्रवासाची सवलत दिली पाहिजे. तसेच ही ऑनलाईन प्रणाली का बंद आहे त्याचे कारण संबधित अधिकारी यांनी द्यावे. त्याचबरोबर ही ऑनलाईन प्रणाली ताबडतोब दुरूस्त करून प्रवाशांचे नुकसान टाळावे.अन्यथा प्रवाशी या स्मार्ट कार्ड ऑनलाईन प्रणाली विरोधात आंदोलन छेडतील.