...राहुल गांधींचा असा ही साधेपणा

...राहुल गांधींचा असा ही साधेपणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूरात दाखल झाले आणि त्यांच्या दौऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विमानतळावरून थेट उंचगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाल्यानंतर त्यांनी टेंपो चालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली. तिथे त्यांनी अर्ध्या तासांहून अधिक वेळ घालवून स्थानिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या जीवनातील अडचणी समजून घेतल्या.

राहुल गांधी हे नेहमीच सामान्य माणसांशी नातं जपण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ओळखले जातात, आणि त्यांच्या या दौऱ्यातही त्यांनी ही खासियत जपली. त्यांच्या या भेटीने स्थानिकांमध्ये एक प्रकारची आत्मीयता निर्माण केली आहे.