टाळं मारूनच दाखव... नारायण राणे यांचा वैभव नाईक यांना इशारा

टाळं मारूनच दाखव... नारायण राणे यांचा वैभव नाईक यांना इशारा

सिंधुदुर्ग : कणकवली पर्यटन महोत्सवात भाजपचे खासदार नारायण राणे हे चांगलेच संतापल्याचे पहायला मिऴाले असुन त्यांनी यावेळी वैभव नाईक यांचा चांगलाच समाचार घेतला. 

नारायण राणे हे म्हणाले ,काही  लोक वृत्तपत्रातून आम्हाला धमक्या देतायत. हे दहा वर्षे आमदार होते सभागृहात कधी बोललेत का? म्हणे मी चिपी विमानतळाला टाळ मारणार..कधी जातोस साग रे मला...टाळ मारूनच दाखव...नाही तुझ्या घराला टाळ मारलं ना तर नारायण राणे नाव सांगणार नाही. वैभव नाईक यांचे थेट नाव घेऊनच नारायण राणे यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.

नारायण राणे पुढे म्हणाले की, या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज मी आणलं. चिपी विमानतळाला विरोध करणारे लोक हे शिवसेनेचे (उबाठा गट) असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. मी कुठेही असलो तरीही सिंधुदुर्गातील वृत्तपत्रातील बातम्या मी बारकाईने वाचतो. चिपी विमानतळाला कोणी विरोध केला होता, आम्हाला विमानतळाला जागा द्यायची नाही. इथे आमची शेती होते, आमची उपासमारी होईल.

कलेक्टरला मी म्हटलं की, या ठिकाणी मला विमानतळ करायचं आहे, ते विमानतळ मी बांधलं उभा राहिलो. आता मात्र टेक्निकल इशूमुळे प्रवासी वाहतूक काही काळ ठप्प आहे. दोडामार्ग मध्ये 12 एकर जागा राखून ठेवली आहे, उद्योग यावेत. एक हजार ते बाराशे कारखाने यावेत म्हणून जागा राखून ठेवलीय. चीपी विमानतळावरून नारायण राणे यांनी आता थेट वैभव नाईक यांना आव्हान दिले आहे.