वाढदिवस एका कार्यक्षम, कर्तुत्वान पोलीस अधीक्षकांचा

वाढदिवस एका कार्यक्षम, कर्तुत्वान पोलीस अधीक्षकांचा

संभाजी पुरीगोसावी / प्रतिनिधी सातारा जिल्हा

दिनांक २८ नोव्हेंबर २०२३. थोडा नवा पायंडा पाडू या ना...सामाजिक दायित्व अंगिकार करू या,दिव्यागांच्या जीवनामध्ये आनंद फुलवू या..निमिंत्त सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसांचे..!

वाढदिवस म्हटलं की आनंदाचा क्षण.तो मोठ्या उत्साहात.जल्लोषात साजरा व्हावा, अशी सर्वांचीच भावना असते.खरंतर वाढदिवस दरवर्षीच येत असतो. समाजाचाच एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या व्यथांची देखील आपल्याला जाणीव असायला हवी.आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या या दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंदाचे दोन क्षण आपण निश्चित आणू शकतो.त्यामुळे रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस दलाच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या कार्याची ओळख निर्माण केलेल्या सातारा पोलीस अधिक्षक समीर शेखसाहेब यांच्या वाढदिवसाला हार तुरे, पुष्पगुच्छ व कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देण्याऐवजी तुम्ही दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणारे त्यांना आवश्यक असणारे साहित्य भेट म्हणून द्या.आपले???? थोडेसे सहकार्य भावी पिढी घडविण्यास नक्कीच मैलाचा दगड ठरेल शिवाय आपल्या सर्वांच्या सहकार्याने वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल तसेच या आनंदाच्या सोहळ्याचा तुम्ही देखील एक धागा होऊन सामाजिक दायित्व निभावल्याचा व कर्तव्यपूर्ती केल्याचा आनंद मिळवता येईल. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,सातारा पोलीस अधिक्षक समीर शेखसाहेब यांच्या रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरिता हार,तुरे,बुके न आणता दिव्यांग बांधवांच्या मूलभूत गरजा व्हीलचेअर, तीन चाकी सायकल कुबडी, वाॅकर, काठी, कानाच्या मशीन , इतर साहित्य आणावेत,सदरील साहित्य हे गरजू दिव्यांग बांधवांना वितरित करणार येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने देण्यात आली आहे. 

तरी ज्या लोकांना दिव्यांग व्यक्तीची मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी वस्तू स्वरूपात मदत करावी. वस्तू बाबत माहिती हवी असल्यास सहा. फौजदार पवार ९९२३४८२०२३ यांचेशी संपर्क साधावा.