विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आत्मविश्वास निर्माण करून स्व ओळख करावी- मानसोपचार तज्ञ डॉ.केतकी बंकापूर
पत्रकार- सुभाष भोसले
विदयार्थ्यानी शिक्षणात आत्मविश्वास निर्माण करून स्वतःची ओळख निर्माण करावी असे आवाहन डॉ केतकी बंकापूर यांनी केले
व्हन्नूर तालुका कागल येथील श्री दौलतराव निकम विद्यालयात रोटरी क्लब ऑफ कागल एमआयडीसी यांनी आयोजित केलेल्या समारंभात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार होते.
डॉक्टर केतकी बँकापुरे यांनी अनेक प्रसंग गोष्टी सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी स्व ओळख स्व स्वीकार स्वसंवाद यावर चर्चा केली स्वतःची वेगळेपण ओळखून जपण्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कागल एमआयडीसी च्या सेक्रेटरी संध्या जोशी,संजीव जोशी,संतोष साखळकर व प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.बी.खाडे यांनी केले तर आभार राहुल मिरजकर यांनी मांडले.