शक्तीपीठाविरोधात शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे

शक्तीपीठाविरोधात शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी देण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरसह १२ जिल्ह्यात शेतकरी पंढरपुरात जाऊन विठ्ठल चरणी साकडे घातले जाणार आहे. 

यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह शेतकरी बांधव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.