HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये २०२५ - २६ च्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये २०२५ - २६ च्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

कोल्हापूर -  आतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा, डिग्री इंजिनिअरिंग, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेससाठी २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इन्स्टिट्यूटच्या प्रवेश विभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदविका आणि पदवीस्तरावरील इंजिनिअरिंग मध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल इंगिनीरिंग या शाखा उपलब्ध आहेत. आयटीआय मध्ये फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक हे ट्रेड उपलब्ध आहेत. मान्यता प्राप्त शॉर्ट टर्म कोर्सेस मध्ये ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (आयटी) एक वर्ष, डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी (पीव्ही) एक वर्ष या कोर्सेचा समावेश आहे.

प्रवेशासाठी १०वी, १२वी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इन्स्टिट्यूटची तंज्ञसमूपदेशकांची टीम मार्गदर्शन करत आहे. पालकांनी व विद्यार्थ्यांनी करिअर माहिती व मार्गदर्शनासाठी आपल्या वेळेनुसार कॅम्पसला भेट देण्याचे आव्हान संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी केले आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, हे एक अत्याधुनिक व सर्वसुविधांनी परिपूर्ण शैक्षणिक संकुल आहे, हे उच्च गुणवत्ता असलेल्या शिक्षणासाठी ओळखले जात आहे. सुमारे १६५ एकर विस्तीर्ण, निसर्गरम्य परिसरात वसलेले हे संस्थान तंत्रशिक्षण, विज्ञान, वाणिज्य, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम तसेच विद्यापीठ स्तरावरील शिक्षण उपलब्ध आहे. येथे आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल वर्गखोल्या, बस सुविधा, वायफाय सक्षम कॅम्पस, स्टार्टअप आणि इनोव्हेशन सेंटर, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आणि उद्योग सानुकूल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, पौष्टिक जेवणाची व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, तसेच जिम, योगा, विविध खेळांची मैदानं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध आहे. इन्स्टिट्यूटचे प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सहकार्य करून विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरणामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूट हे पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श व प्रतिष्ठित शिक्षण संस्थान म्हणून ओळखले जात आहे.

शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रकिया आणि करिअर माहिती आणि मार्गदर्शनाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.