शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना पीएच.डी.

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना पीएच.डी.

कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील पीएच.डी. पदवी जाहीर झाली.

जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शिक्षणाधिकारी विद्यावाचस्पती झाले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांचीही पीएच.डी. शिक्षणशास्त्रात पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरात कार्यरत असताना दोन्ही शिक्षणाधिकारी पीएच.डी. पदवीने उच्च विद्याविभूषित झाले आहेत.

सेवा सदन कॉलेज ऑफ एज्युकेशन,उल्हासनगर या महाविद्यालयामार्फत डॉ. मीना दत्तात्रय शेंडकर यांनी अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांप्रती विशेष शिक्षक आणि सामान्य शिक्षकांचा दृष्टिकोन आणि अभिरुचीचा तुलनात्मक अभ्यास' या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.

डॉ. बिना एस. खेमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.