शिवाजी विद्यापीठात ऑनलाइन एम.बी.ए. बरोबर आता ऑनलाइन एम.कॉम.,एम.एस्सी (गणित), अभ्यासक्रमांना मान्यता

शिवाजी विद्यापीठात ऑनलाइन एम.बी.ए. बरोबर आता ऑनलाइन एम.कॉम.,एम.एस्सी (गणित), अभ्यासक्रमांना मान्यता

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ नॅक A++ मानांकन व विद्यापीठ अनुदान आयोगाने कॅटेगिरी-I दर्जा बहाल केल्याने एम.कॉम.,एम.एस्सी (गणित) या अभ्यासक्रमांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी दिली. 

एम.बी.ए., अभ्यासक्रमास यापूर्वीच ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यास नवी दिल्ली येथील  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरस्थ शिक्षण परिषद तसेच ए.आय.सी.टी.ई. या संस्थांकडून ऑनलाइन एम.बी.ए., अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली होती. त्यानुसार हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अशातच एम.कॉम., एम.एस्सी (गणित),या अभ्यासक्रमांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी मान्यता मिळाली असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा ठरला आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रतील एकमेव ऑनलाइन एम.बी.ए., एम.कॉम., एम.एस्सी (गणित) सुरु करणारे सार्वजनिक  विद्यापीठ ठरले आहे. ही शिवाजी  विद्यापीठाच्या इतिहासातील गौरवास्पद बाब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय सांभाळत ऑनलाइन एम.बी.ए. एम.कॉम., एम.एस्सी (गणित), अभ्यासक्रमाची पदवी घेता येणार आहे. हा अभ्यासक्रम प्रवेश, अध्ययन, परीक्षा व निकालापर्यंत असणारी सर्व शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपाची असणार आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या पदवी इतर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या समकक्ष आहे.

एम.बी.ए.,एम.कॉम.,व एम.एस्सी (गणित), या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी सुसज्ज अशा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे विषय तज्ञांनी विकसित केलेले  व्हीडीओ लेक्चर्स, इ – बुक्स लाईव्ह काउंसलिंग सेशन, डिस्कशन फोरम, प्रॅक्टिस टेस्टच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ऑनलाइन एम.कॉम., व एम.एस्सी (गणित), अभ्यासक्रम मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषद, विविध अधिकार मंडळे, कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील, उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे यांनी  विशेष प्रयत्न केले.