ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी बाबत

ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी बाबत

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी ही प्रक्रिया दिनांक 23 जुलै ते 26 जुलै या कालावधीत 271 चंदगड विधानसभा मतदान केंद्र आणि 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ यांच्यासाठी घेण्यात येणार आहे.

271 चंदगड मतदार संघातून नंदाताई कुपेकर यांनी 05 मतदान केंद्रावरील EVM मशीनची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी केली होती.

तसेच 276 कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश लाटकर यांनी 05 मतदान केंद्रावरील EVM मशीनची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी केली होती.

त्याप्रमाणे भारत निवडणुक आयोगाने 23 ते 26 मध्ये बेल कंपनीच्या इंजिनीयर मार्फत प्रक्रिया करण्याकरिता जिल्हास्तरीय यंत्रणेला कळविले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे तयारीची पाहणी केली. बेल कडून 04 इंजिनीयरची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे.