क्रिडाई'च्या वतीने फिल्टर हाऊस परिसरामध्ये वृक्षारोपण..

क्रिडाई'च्या वतीने फिल्टर हाऊस परिसरामध्ये वृक्षारोपण..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारच्या हरित महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिल्टर हाऊस परिसरामध्ये क्रिडाई,क्रिडाई युथ विंग,क्रिडाई वुमेन्स विंग, यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी कवठ,कदंब,करंज,निम,ताम्हाण,जारूळ,अशी देशी पद्धतीची १० फूट उंचीची रोपे लावण्यात आली.

       या वृक्षारोपणावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत,उपाध्यक्ष गौतम परमार,सचिव संदीप मिरजकर,खाजणीस अजय डोईजड उपस्थित होते. क्रिडाई महाराष्ट्र वूमेन्स विंग च्या को कन्व्हेनर सपना मिरजकर ,क्रिडाई कोल्हापूर वूमेन्स विंग च्या कोऑडोनेटर संगीता माणगावकर,को कोऑडोनेटर मोनिका बकरे,रुपाली बकरे,पूजा वाघुले,गणेश सावंत,विजय माणगावकर,विश्वजित जाधव,दिपक वाघुले,अमोल देशपांडे आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.