ऑनलाईन एम.बी.ए.अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत

ऑनलाईन  एम.बी.ए.अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क  सवलत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अधिकार मंडळाने शुल्कामध्ये सवलत दिलेली आहे. याचा लाभ सरकारी संस्था, निमसरकारी व खाजगी संस्था यामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांनी घ्यावा असे आवाहन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी केले.


दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन  एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यापीठातील आजी - माजी कर्मचारी, त्यांचे पाल्य तसेच शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर विद्यार्थी, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक वर्ग तसेच विद्यापीठ व महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी व त्यांचे पाल्य यांना यातील एक किंवा एकापेक्षा अधिक गटात समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षण शुल्कामध्ये (ट्युशन फी ) एकत्रित १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

तसेच सरकारी संस्था, निमसरकारी व खाजगी संस्था यांच्याकडून ऑनलाईन एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्कामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना  १० टक्के सवलत देणे साठी प्रस्ताव पाठविल्यास त्यांच्याशी सांमजस्य करार करून त्यांना सवलत देण्याबाबत सकारात्मक विचार करता येईल. अशी माहिती प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी दिली.