शेतकरी संघ निवडणूक उमेदवार सुभाष जामदार,विजय पाटील व त्यांचे कार्यकर्ते

शेतकरी संघ निवडणूक उमेदवार सुभाष जामदार,विजय पाटील व त्यांचे कार्यकर्ते

पत्रकार -नारायण लोहार

कोल्हापूर -आज दिनांक २१ रोजी शेतकरी संघाची निवडणुक पार पडली.त्यामध्ये शाहुवाडी तालुक्यात केंद्रीय प्राथमिक शाळा शाहुवाडी येथे ही निवडणूक पार पडली.शाहुवाडी तालुका संस्था गटातून एकूण मतदान५२पैकी ४९मतदान झाले.१ मतदान मयत होते.तर २ मतदारांनी मतदान केले नाही.त्याचबरोबर व्यक्ती सभासद गटात एकूण मतदान २७० पैकी १३५ झाले.या गटात मयत झालेले मतदार ७१ आहेत.६४ मतदारांनी मतदान केले नाही.या शेतकरी संघाच्या निवडणुकीत आमदार डॉ.विनय कोरे गटाचे पारडे यशस्वी होणार असा कार्यकर्त्यांचा १००%अंदाज आहे .या निवडणुकीत सुभाष जामदार यांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. नेर्ले गावचे सखाराम भणगे, आनंदराव जामदार, अशोक जामदार, राजेंद्र जामदार,उमेश पाटील, दिलीप गवळी,विजय पाटील हे कार्यकर्ते उपस्थित होते.