संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणार; शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांची ग्वाही

कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ- शाखा करवीर तालुका यांची महामंडळ सभा करवीर पतसंस्था येथे आयोजित करणेत आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना राजाराम वरुटे यांनी संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. असर संस्थेचा निषेध करुन लवकरच नवीन १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द करणेसाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असून तो लवकरच रद्द केला जाईल. अशी ग्वाही दिली.
यावेळी अध्यक्ष साताप्पा चौगले यांनी प्रास्ताविक केले. महामंडळा मध्ये मा. प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारूती दिंडे, संदिप पाडळकर, श्वेता खांडेकर, श्रीकांत चव्हाण, नवनाथ व्हरकट यांनी मनोगते व्यक्त केली.
या महामंडळामध्ये मा. मनोज माळवदकर, मानद सचिव- छ. शिवाजी पत संस्था, ज्ञानदेव पाटील आमशी यांनी संघटने मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा यथोचित सत्कार करणेत आला. यावेळी मा. मनोज माळवदकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच पतसंस्था नुतन चेअरमन बाजीराव पाटील, व्हा. चेअरमन वर्षासनगर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.