HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सिलेंडरचा भयंकर मोठा स्फोट ,सिलेंडर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जाऊन आदळला

सिलेंडरचा भयंकर मोठा स्फोट ,सिलेंडर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जाऊन आदळला

छत्रपती संभाजीनगर : येथे भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ही आग गादी दुकानाला लागली असून लागलेल्या आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्ररुप धारण केलं. गादी दुकानाच्या शेजारी असलेल्या सहा दुकानांनाही या आगीचा फटका बसला आहे.  यात गॅस सिलेंडर ने पेट घेतल्याने भयंकर स्फोट झाला. या स्फोटात दोन किलोमीटरपर्यंत आवाज झाला. तर तुटलेला सिलेंडर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जाऊन आदळला. परिसरात दोन इमारतींच्या काचा फुटून सिलिंग निखळले. सुदैवाने या भीषण स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, दुकान मालकांचे प्रचंड नुकसान झाले.

नेमकं काय घडलं ?

या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाई परिसरामध्ये अशोक हिवाळे यांचे मुख्य रस्त्यावर पाच गाळे आहेत. या गाड्यांमध्ये दूध डेरी, चप्पल विक्री, फॅब्रिकेशन व गादीघर आहे. ही दुकाने नियमितपणे सुरू होती. दरम्यान सोमवार दिनांक १० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास गादी घर असलेल्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत दुकानातील कापूस जळाला. सोबतच असलेल्या गाद्यांनी पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.आग एवढी भीषण होती की, आगीने शेजारील ५ दुकानांना कवटाळलं. आग रौद्ररूप धारण करत असताना नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचे प्रयत्न अपयशी ठरले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. आग लागून अर्ध्या तासानंतर अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली. तोपर्यंत दुकानांमध्ये साहित्य जळून खाक झाले होते. 

सिलेंडरच्या स्फोटने एका इमारतीच्या चौथ्या मजल्याला भगदाड पडले. या भीषण आगीमुळे एकूण ६० लाखांपेक्षा अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.