अज्ञात वाहनाच्या धडकेत सख्ख्या भावांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या  धडकेत सख्ख्या भावांचा मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जलब राष्ट्रीय महामार्गावर पारखेड फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या धडकेमध्ये जलब येथील दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल  करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना महादेव अवचार आणि रामदास अवचार या दोन सख्ख्या भावांचा  मृत्यू झाला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, जलब येथील अक्षय बबन अवचार आणि महादेव अवचार, रामदास अवचार हे आपल्या दुचाकीने पारखेडवरुन जलबकडे परत येत असताना त्यांच्या दुचाकीला पारखेड फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेल्या दोन सख्खा भावांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्रथम खामगाव व पुढील उपचाराकरता अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.दुचाकी चालक अक्षय बबन अवचार यांची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने जलब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.