सुप्रसिद्ध दिग्दर्शक रमेश गुप्ता यांचे निधन
मुंबई - सुप्रसिद्ध दिग्दर्शक रमेश गुप्ता यांचे निधन झाले. 'परंपरा' या हिंदी मालिकेचे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. दिग्दर्शकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेली 'परंपरा' ही हिंदी टीव्ही मालिका खूप लोकप्रिय झाली.
निर्माते मनीष गोस्वामी यांनी रमेश गुप्ता यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांच्या आठवणींबद्दल सांगताना मनीष म्हणाले की, 'परंपरा मालिकेचे पहिले ५२ भाग दिग्दर्शित करणारे मदन कुमार यांच्या निधनानंतर रमेश गुप्ता यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आणि हा शो पाच वर्षे यशस्वी करून दाखवला. ते खूप चांगले आणि शिस्तप्रिय दिग्दर्शक होते. रमेश गुप्ता हे सेटवर त्यांच्या कामासाठी ओळखले जायचे. त्यांचं शेड्युलच्या आधीच काम पूर्ण झालेलं असायचं. ते शक्य होईल तितक्या लवकर काम पूर्ण करायचे.'