सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ, चांदी झाली स्वस्त ; पहा आजचा दर किती ?

मुंबई: आज शनिवार व्यवहार दिवशी, 24 मे 2025 रोजी, सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. एमसीएक्स एक्सचेंजवर सकाळी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 864 रुपयांनी वाढून 96,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
सध्या विवाह हंगाम सुरु असल्याने आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, व्यापार युद्धासारख्या घटकांमुळे ही अस्थिरता आहे.
आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोनं 89,900 रुपयांना तर 24 कॅरेट सोनं 98,080 रुपयांना विक्रीस आहे. चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली असून, एक किलो चांदीचा भाव 99,900 रुपये आहे, जो काल 1,00,000 रुपये होता.