HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

स्मार्ट प्रीपेड मीटर , एसटीचा भाडे वाढीचा निर्णय मागे घ्या : राशपची निवेदनाद्वारे मागणी

स्मार्ट प्रीपेड मीटर , एसटीचा भाडे वाढीचा निर्णय मागे घ्या : राशपची निवेदनाद्वारे मागणी

कागल :  एसटीची अन्यायकारक भाडेवाढ मागे घ्यावी,प्रीपेड स्मार्ट मीटर बसवू नयेत तसेच नवीन सीमा तपासणी नाक्यावरील धोकादायक अडथळे हटवा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिले. 

याबाबत अधिक माहिती अशी की ,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कागलमधील नवीन सीमा तपासणी नाक्याशेजारी उभारलेले अडथळे धोकादायक आहेत. या ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीस जीव गमवावा लागला.सिमेंटचे हे  पक्के व अरुंद अडथळे हटवावेत.महाराष्ट्रात प्रवेश करताना ठेवलेल्या खुल्या मार्गाप्रमाणे कर्नाटकात प्रवेश करतानाचा मार्गही खुला ठेवावा.अशी मागणी करण्यात आली.यावर तहसीलदार वाकडे यांनी संबंधितांना याबाबत सूचना करु असे सांगितले.या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनाही दिले.

शासनाने अत्यंत घाईने एसटीची भाडेवाढ केली आहे.महागाईने त्रस्त झालेल्या जनतेवर भाडेवाढीचा बोजा पडला आहे.ही अन्यकारक भाडेवाढ मागे घ्यावी.असे निवेदन कागल आगार प्रमुख संदीप पाटील यांना दिले. शासन व महावितरणकडून वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातला आहे.ग्राहकांची मागणी नसताना ही मीटर लादण्यात येत आहेत.त्यामुळे ग्राहकांचा त्यास तीव्र विरोध आसून तो डावलून मीटर जोडणीची सक्ती करू नये.खाजगी ठेकेदारांना पोसणारा व विज ग्राहकांना भुर्दंड देनारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.तसेच हे काम तात्काळ थांबवावे.असे निवेदन महावितरणच्या अधिका-यांना दिले.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, अजीतसिंह घाटगे,सुधाकर सुळकुडे,'शाहू'चे संचालक प्रा.सुनील मगदूम,सतीश पाटील, साताप्पा घाटगे,प्रमोद सोनुले,प्रमोद कदम,सज्जन पवार,अभिजीत कांबळे,बाळासो नाईक,मनोज दावणे,वसंत मांजरेकर,प्रवीण कुराडे,पांडूरंग जाधव,आनंदा चंदे आदींच्या सह्या आहेत.

... तर तीव्र आंदोलन 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून यावर तात्काळ मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.संबंधित अधिकारी याबाबत सकारात्मक आहेत.या मागण्यांबाबत विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवानंद माळी यांनी दिला आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.