हिरोची नवीन १२५ सी. सी डेस्टिनी बाजारात दाखल

हिरोची नवीन १२५ सी. सी डेस्टिनी बाजारात दाखल

कोल्हापूर(प्रतिनिधी) : जगातील नं १ टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांचे तर्फे नवीन १२५ सी. सी. डेस्टिनी बाजारात आणली आहे. या गाडीचे अनावरण निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भागवत यांचे हस्ते कोल्हापूर इंजिनियरिंग असोसियेशन शेठ रामभाई सामाणी हॉल येथे पार पडले.ही गाडी एसएमजी घाटगे आणि युनिक शोरुम येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

   या गाडीचे वैशिष्ट्ये म्हणजे १२५ सी सीचे पॉवरफुल्ल इंजिन बरोबर चांगला पिक अप व सर्वोत्तम मायलेज आहे. तसेच सदरची गाडी VX ,ZX व ZX प्लस या तीन व्हेरिएंट मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि पूर्ण मेटलमध्ये आहे.

सादर गाडीचे इंजिन १२५ सी सी असून ते ७००० rpm व १०.४ rpm देते. हिरोच्या नाविन्यपूर्ण आयडियल स्टॉप स्टार्ट तंत्रज्ञानामुळे सर्वोत्तम ५९ कि मी चे मायलेज मिळते सर्व कुटुंबासाठी डिझाईन केलेली हि स्कूटर असून प्रशस्त लेग रूम लांब कम्फर्टेबल सीट, LED प्रोजेक्ट हेड लॅम्प ,डायमंड कट ऑलोय व्हील्स बरोबर प्रीमियम इंटिरिअर्सचा समावेश आहे.आताची ही आठवी गाडी असून ही गाडी ५९ अँव्हरेज देते आणि गाडीचे वजन ११५ किलो आहे.ही गाडी एकूण ब्लॅक,रेड,ब्ल्यू,व्हाईट आणि पिंकिज अशा पाच कलर मध्ये आहे.

 या अनावरण सोहळ्याप्रसंगी एस एम घाटगे हिरोचे पार्टनर मिलिंद घाटगे व युनिक हिरोचे एम डी विशाल चोरडीया यांनी अधिक माहिती व टेस्ट राईडसाठी एसएमजी घाटगे आणि युनिक शोरूमला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.

   या गाडी विषयी बोलताना एस एम घाटगे हिरोचे पार्टनर मिलिंद घाटगे आणि युनिक शोरुमचे जनरल मॅनेजर विजय जाधव व सचिन कदम यांनी हिरो कंपनीने नव्या ढंगातील आठवी स्कूटर गाडी बाजारात आणली असून ही गाडी कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाली असून ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन ही गाडी पहावी असे आवाहन केले आहे.अनावर प्रसंगी या दोन्ही शोरूमचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.