२०२५ मध्ये बॉलीवूडमध्ये असणार ' या ' स्टारकिड्सचा बोलबाला

२०२५ मध्ये बॉलीवूडमध्ये असणार ' या '  स्टारकिड्सचा बोलबाला

माझा महाराष्ट्र ऑनलाईन: शाहरुख खान ,सलमान खान,आमिर खान यांसारख्या दिग्गजांचे सिनेमे आजही बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम करून बक्कळ कमाई करतात. हे दिग्गज गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून बॉलीवूडमध्ये असून त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. हे सर्व स्टार्स आज त्यांच्या पन्नाशीत असून त्यांचे स्टारडम आजही टिकून आहे. या पिढीतील स्टार्सचा बॉलीवूडमध्ये प्रभाव असला तरी बॉलीवूडमध्ये आता नवी पिढी येत आहे. यात शाहरुख आणि सलमानच्या पिढीतील स्टार्सची मुले असणार आहेत.

'हे ' करणार डेब्यू 

२०२५ मध्ये, बॉलीवूडमध्ये नव्या पिढीचा प्रभाव दिसू लागणार आहे. आर्यन खान, इब्राहिम खान, राशा थडानी, शनाया कपूर आणि अमन देवगण यासारखी तरुण पिढी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचबरोबर नितांशी गोयल, अभय वर्मा आणि लक्ष लालवानी हे तरुण कलाकार सिनेमाला नवी दिशा देण्यासाठी पुढे येत आहेत.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या ‘स्टारडम’ या वेब सीरिजमधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान करण जोहरच्या बॅनरखाली अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी १९ वर्षांची असून अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणबरोबर ‘आजाद’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानने यावर्षी (२०२४) मध्ये आलेल्या ‘महाराज’ या सामाजिक आशयाच्या पीरियड सिनेमातून त्याच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाची निवड केली होती.