४८ तासांच्या आत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवा : गृहमंत्री अमित शहा

४८ तासांच्या आत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवा : गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानशी संबंधित कडक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांना फोन करून ४८ तासांच्या आत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या सूचना दिल्या. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील १९१ पाकिस्तानी नागरिकांनी अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेद्वारे भारत सोडला.

पहलगामच्या बैसनर खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हल्ल्याला पाकिस्तानचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भारत सरकारने १४ प्रकारचे पाकिस्तानी व्हिसा रद्द केले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानात गेलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर परतण्याचा सल्ला देण्यात आला असून, १ मे पर्यंत वैध कागदपत्रांसह परत येण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या २८७ भारतीय नागरिक परतले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातही प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाची तपासणी करून ४८ तासांपेक्षा जास्त राहिल्यास कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, दीर्घकालीन व्हिसा असलेल्या हिंदू पाकिस्तानी नागरिकांवर ही कारवाई होणार नाही.