लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री - रितुराज टी. पाटील

कोल्हापूर - तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीचा वापर करून आयुष्यात यशस्वी व्हा. फक्त आपल्या शाखेपुरतं मर्यादित न राहता अनेक विषयात पारंगत व्हा, असा कानमंत्र 'मौरीटेक ' हैद्राराबादचे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिला. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘टेक्नोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राष्ट्रीय स्तरावरील या दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यातील 1800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
रितुराज टी. पाटील म्हणाले, हा फक्त टेक्नॉलॉजीचा इव्हेंट नाही तर कोलाब्रेट लर्निंग इव्हेंट आहे. ही खुप मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, यासाठी फक्त प्रत्येकाकडे शिकण्याचा भूक हवी. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या शाखेपुरते मर्यादित न राहता, बहू शाखीय ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.
प्राचार्य संतोष चेडे यांनी, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून खूप मोठी आव्हानं समोर आहेत. उद्योगांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्या समजावून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे नॉलेज मर्यादित ठेवू नका, त्याचा उद्योग विश्वाला फायदा करून द्या असे आवाहन त्यांनी केले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यातून पंधराशेहुन अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सिव्हिल विभागाकडून सेतू बांधा रे, सी.एस.ई विभागाकडून अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन, आर्किटेक्चर विभागाकडून अनसिंगकेबल डिझाईन, द फ्लोटिंग चॅलेंजेस, एआयएमएल कडून लॉन्च पॅड (शार्क टॅंक), इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रमुनिकेशन विभागाकडून रोबो सॉकर, केमिकल विभागाकडून प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉडेल कॉम्पिटिशन, मेकॅनिकल विभागाकडून रोबो रेस, टेक डिबेट अशा एकूण आठ विभागाकडून विविध प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आल्या.
सर्व विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना मिळून एकूण अडीच लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते जी त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. अजित पाटील, समन्वयक डॉ. प्रशांत जगताप, डॉ. कपिल कदम, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.