प्रसंगावधान राखत जीवनदान देणाऱ्या पोलीस हवालदाराचा वाहतूक सेनेच्यावतीने सत्कार

प्रसंगावधान राखत जीवनदान देणाऱ्या पोलीस हवालदाराचा वाहतूक सेनेच्यावतीने सत्कार
वाहतूक पोलीस हवालदारांच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान

कोल्हापूर / प्रतिनिधी

वाहतूक पोलीस हवालदारांच्या तत्परतेमुळे एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे. तावडे हॉटेल परिसरात वाहन चालक अचानक बेशुद्ध पडला. यावेळी पोलीस हवलदार बाबासाहेब कोळेकर यांनी प्रसंगावधान राखत बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या चालकास वेळेत रुग्णालयात दाखल करून जीवदान दिले. 

याबद्दल शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, दत्ताजी फराटे, आप्पासो कांबळे, उत्तम फडतरे, रामचंद्र मोरे, अशितोष आरगे, बिरू फराकटे, अशोक फराकटे आदी उपस्थित होते.