Emergency Alert! असा मेसेज येऊन अलार्म वाजतोय..?? जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सकाळ पासून मोबाईल वर Emergency Alert! असा मेसेज येऊन अलार्म वाजतोय..?? तर घाबरून जाऊ नका.. केंद्र सरकार मार्फत आपत्ती व्यवस्थापन सेवेसंदर्भात काही टेस्ट चालू आहेत..!
राज्यात अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या पूर्वसूचना देण्यासाठी संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवित हानीचा धोका टळला जावा या साठी पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत आहे.
हे संदेश नेमके कसे येतात..?
आपल्या मोबाईल मध्ये अलर्ट नावाचे फीचर असतं.या फीचर द्वारे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपल्याला हे अलर्ट येत असतात.या अलर्ट फीचरमुळे मोबाईल यूजर्सना भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी या सारख्या नैसर्गिक आपत्तींची नागरिकांना आधीच सतर्क केले जाईल या उद्देशाने ही यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाकडून राबवण्यात येत आहे.
भारतात पूर, भूकंप, भूस्खलन असे बरेच नैसर्गिक आपत्ती घडत आहेत.यासंदर्भात नागरिकांना सतर्क करण्यासाठी मोबाईल द्वारे पूर्वसूचना देण्यासाठी सरकारने सर्व मोबाईल उत्पादकांना आपत्कालीन अलर्ट फीचरचे अपडेट देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर सरकार आता जिल्हा पातळीवर या अलर्ट चे प्रयोग राबवत आहे.