HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा : खा. शरद पवार

आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा : खा. शरद पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी शरदचन्द्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार  दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे  कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पवार यांचे  पक्षाच्या  पदाधिकाऱ्यांच्या  वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

विमानतळ व्हीआयपी कक्षामध्ये पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेत असताना जिल्हा परिषद व महापालिका निवडणूकीसाठीचे निर्णय त्या-त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून जिल्हाध्यक्षांनीच घ्यावे असे धोरण आम्ही ठरवत आहोत असे सांगीतले.  

निवडणुकीच्या निकालावरही दिलखुलास चर्चा केली, नाराज न होता कामाला लागा. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रदेश कडून होईल असे सांगत असताना सर्व कार्यकर्त्यांची मनोगत सुद्धा ऐकून घेतली.  इंडिया आघाडी बद्दल विचारले असता खासदार शाहू महाराज व आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे काम चालू असल्याचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गोष्टींवर देखील चर्चा केली. 

त्यानंतर शरद पवार पुढील दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्गकडे रवाना झाले. उद्या पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्या शेजारील गवसे, आंबोली या ठिकाणी ऊस संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी येणार आहेत. 

यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सरचिटणीस सुनील देसाई, युवक अध्यक्ष रोहित पाटील, ज्येष्ठ नेते बाजीराव खाडे उपस्थित होते. त्यांच्या सोबत  प्रतिभाताई पवार देखील उपस्थित होत्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.