HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'एनआयटी' मधील एआयएमएल कोर्सच्या तुकडीत वाढ ..!

'एनआयटी' मधील एआयएमएल कोर्सच्या तुकडीत वाढ ..!

कोल्हापूर - श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) या डिप्लोमा कोर्सच्या तुकडीत वाढ करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी मान्यता दिली. 

एनआयटीमध्ये सद्यस्थितीत ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर व एआयएमएल हे सहा डिप्लोमा कोर्सेस आणि मेकॅनिकल अँड मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पाॅवर, कॉम्प्युटर सायन्स व एआयएमएल हे चार डिग्री कोर्सेस आहेत. यापैकी डिप्लोमा एआयएमएलची एक तुकडी वाढवत ६० वरून १२० जागा अशी प्रवेश क्षमता झाल्याची माहिती संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमधून स्टार्टअप व उद्योजक निर्मितीसाठी एनआयटीमध्ये इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) सारखे व्यासपीठ उपलब्ध असून आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले प्रकल्प विद्यार्थ्यांनी केले आहेत. एनआयटीमध्ये विद्यार्थ्यांना विना व्याज हप्त्याने फी भरण्याची सुविधा व बस सेवा उपलब्ध असून कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे पाल्य आणि संस्थेतील शाखांचे विद्यार्थी यांना फीमध्ये विशेष सवलत दिली जाते असे संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी सांगितले. आधीचे न्यू पॉलिटेक्निक व आताचे एनआयटी या कॉलेजने तंत्रशिक्षणाची उज्ज्वल परंपरा गेली ४१ वर्षे जपत राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देणारे अभियंते घडविले असून इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेशासाठी कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.