अपात्रतेची कार्यवाही ?--मुद्त् संपूनही दिले नाही जात वैधता प्रमाण पत्र
अपात्रतेची कार्यवाही ?--मुद्त् संपूनही दिले नाही जात वैधता प्रमाण पत्र
सेलू प्रतिनिधी:-
आरक्षित जागेतून निवडणूक लढणाऱ्या सदस्यांना एक वर्षाच्या आत जात। वैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधन कारक असते.मात्र पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ़ देऊनही 20 ग्राम पंचायतीच्या 20 सदस्य आणि 1 सरपंचांनी अजून जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागास दाखल केले नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सेलू तालुक्य्यातील 67 ग्रामपंचायतीचा निकाल 18 जानेवारी 2021 रोजी जाहीर झाला होता. यातील 205 सदस्य आरक्षित जागेवरून निवडून आले होते त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी 17 जानेवारी 2022 पर्यत मुदत दिली होती..परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ही मुद्त् वाढ 17 जानेवारी 2023 अशी दिली होती. 205 सदस्य पैकी 184 सदस्यांनी मुदत संपायच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले होते.
परंतु अद्याप 21 सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाण मुदतीत दाखल केले नसल्यामुळे उप जिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या मध्ये त्यांनी आपण वेळेत जात वैधता प्रामाणपत्र दाखल न केल्यामुळे आपले पद अनर्ह ठरवण्याबाबत् 17 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खुलासा करण्यासाठी अंतिम संधी दिली आहे.
यात जात वैधता प्रमाणपत्रा बाबत खुलासा न दिल्यास संबधीत सदस्यावर अपात्रतेची कार्यवाही होऊ शकते.
----------------------------
कारणे दाखवा नोटीस
---------------------------
तहसील निवडणूक् विभागा कडून मिळालेल्या माहिती वरून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये कान्हड,सेलवाडी,राजुरा,पिंपरी खुर्द,कुडा,पिंपरी बुद्रुक ,सिंगठाळा,खैरी,हातनूर,शिराळा,तळतुंबा,सावंगी,पिंपरी बुद्रुक,तांदुळवाडी,करजखेडा,ब्रह्म वाकडी,देवळगाव गात, खवणे पिंपरी या गावातील सदस्यांचा समावेश आहे.